सौंदत्ती : सौंदत्ती तालुक्यातील हिरूर गावात आज शनिवारी विजेचा धक्का लागून दोन शेतकर्यांचा जागीच मृत्यू झाला.
फकिराप्पा सिद्धप्पा चंदरगी (54) आणि महादेवा दुर्गाप्पा मैत्री (40) अशी मृत्यू झालेल्या शेतकर्यांची नावे आहेत. हे दोघेही ऊसाच्या शेतात काम करत असताना पडलेल्या विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने हा अपघात झाला.
सौंदत्ती पोलीस ठाण्याचे अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कारवाई सुरू केली आहे.