डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बालक दगावल्याचा पालकांचा आरोप
बेळगाव : बिम्स रूग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी बिम्स रूग्णालयासमोर डॉक्टरांच्या विरोधात संताप व्यक्त केला.
होन्निहाळ गावात राहणार्या सुनीता यांना आठ दिवसांपूर्वी प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला.
दरम्यान, कुटुंबीय रुग्णालयाच्या आवारातच ठिय्या मांडून बसले आहेत.
यावेळी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती उलगडण्याचा प्रयत्न केला.
Belgaum Varta Belgaum Varta