बेळगाव : विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या मागणीसाठी देशभरातील सेवानिवृत्त बीएसएनएल कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातही आज आंदोलन करण्यात आले.
पेन्शनमध्ये वाढ करावी, वैद्यकीय खर्च द्यावा, आयडीएचा परतावा द्यावा आणि पेन्शनवर संसदीय मंडळाने दिलेल्या अहवालाची अंमलबजावणी करावी या चार मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी एआयबीडीपी असोसिएशनच्या नेतृत्वाखाली बीएसएनएलच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी बुधवारी बेळगावातील कॅम्पमधील बीएसएनएलच्या मुख्य कार्यालयासमोर एकदिवसीय आंदोलन केले.
यावेळी बोलताना संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रामू तटवटी यांनी सांगितले की, चार महत्त्वाच्या मागण्यांच्या पूर्ततेच्या मागणीसाठी देशभरातील बीएसएनएल सेवानिवृत्त कर्मचारी आज देशभरात एक दिवसाचे आंदोलन करत आहेत.
केंद्र सरकारने आमची मागणी तातडीने पूर्ण करावी. निवृत्ती वेतनवाढीबाबत संसदीय मंडळाने दिलेल्या अहवालाची केंद्र सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
एन. के. भोसले, एस. एस. सारापुरे, एस. के. घस्ती, बी. बी. अंगडी व इतर सेवानिवृत्त कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta