बेळगाव : हिंडलगा येथील नवोदित चित्रपट निर्माते व लेखक राजू कोकितकर यांनी प्रवास या हिंदी लघु चित्रपटाचा शुभारंभ कार्यक्रम येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश बेळगुंदकर होते.
प्रमुख अतिथी म्हणून कन्नड चित्रपट अभिनेते संतोष झावरे व बेळगावचे कट्टाप्पा, निर्माते राजू कोकितकर, अनुप पवार, अनिल हुदली व कृषी पत्तीनच्या संचालिका पार्वती कोकितकर उपस्थित होत्या.
स्वागतगीतानंतर प्रास्ताविक मनोगत निर्माते राजू कोकितकर यांनी केले व सर्व कलाकारांचा परिचय करून दिला. अतिथींचे स्वागत कलाकारांच्या हस्ते गुलाब पुष्प देवून करण्यात आले.
याप्रसंगी पार्वती कोकितकर यांचा गौरव करण्यात आला. नवोदित चित्रपट कलाकार यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले व शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संतोष झावरे व कट्टाप्पा यांनी आपला अनुभव कथन केला व धैर्याने काम करण्याचे आवाहन केले. या चित्रपटात शशिकांत नाईक, नेहा मुजावर, जयवंत साळुंके, महेश काकतकर, वैष्णवी मंगनाइक, पुष्पा जाधव, रिया कोकितकर, सोनाली नाईक, मृण्मयी नाईक या सर्वांनी केलेल्या अभिनयाची स्तुती केली.
अध्यक्षीय भाषणात चित्रमहर्षी कै. के. बी. कुलकर्णी तसेच गावात पुर्वी नाट्यक्षेत्रात अभिनय केलेल्या कलाकारांचा परिचय करून दिला व या नवोदित कलाकारांनी केलेल्या अभिनयाची स्तुती करून शुभेच्छा दिल्या. या पस्तीस मिनीटांच्या लघु चित्रपटाचे फीत कापून व प्रवास या फलकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयवंत साळुंके व आभार शशिकांत नाईक यांनी मानले. या कार्यक्रमाला महालक्ष्मी देवी यात्रा उत्सव संघाचे खजिनदार उदय नाईक, पदाधिकारी राजू कुपेकर, श्रीकांत जाधव, मारुती पावसे, जमखंडी केंद्र कारागृहाचे अधिक्षक उत्तम पाटील, अनिल कुलकर्णी, अनिल हेगडे, अमोल नाईक, ऋषिकेश पवार, नागेश हिंडलगेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.