बेळगाव : आज दि. 24/7/2022 रोजी भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीणच्या वतीने सालाबादप्रमाणे सात हजार रोपांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना भाजपा बेळगाव ग्रामीण अध्यक्ष श्री. धनंजय जाधव म्हणाले, काही वर्षांपूर्वी सरकारी जागेमध्ये आम्ही वृक्षारोपण करत होतो. पण त्याची जोपासणा होत नसल्याने बरीच झाडे नाश होत होती. पण गेल्या 2 वर्षापासून आम्ही ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक महाशक्ति केंद्रामधून ट्रॅक्टरच्या माध्यमातून सामान्य जनतेला व कार्यकर्त्यांना रोपे वितरण करून आपल्या परसु किंवा दारामध्ये तसेच शेतामध्ये झाडे लावणे व त्या झाडांना आपल्या घरातील लहान मुलाचे नाव देणे व आपल्या घरातील लहान मुलाप्रमाणे जोपासणे ही काळाची गरज आहे.
आज भाजपा नेते कर्नाटक फॉरेस्ट डेवलपमेंट कॉर्पोरेशनचे संचालक श्री. सुरेश देसाई यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच भाजपा बेळगाव विभाग सह संघटना सरचिटणीस श्री. जयप्रकाशजी यांच्याहस्ते नारळ फोडून वृक्ष भरलेले 16 ट्रॅक्टर रवाना करण्यात आले. महिला मोर्चा अध्यक्ष भाग्यश्री कोकीतकर यांच्या हस्ते गाडीची पूजा करण्यात आली. याप्रासंगी खानापूर भाजपा नेते किरण यळ्ळूरकर, रामचंद्र मनोळकर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळ सरचिटणीस पंकज घाडी, संजय अष्टेकर, नारायण पाटील, लिंगराज हिरेमठ, बाळू पाटील, लक्ष्मण चोपडे, येतेश हेब्बाळकर, गुरूराज हलगती, भुजंग सालगुडे, सुरेश घोरपडे, मिथिल जाधव, ओंकार पाटील, राजू जळगेकर, सचिन कांगले, हेमंत पाटील आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta