शंकर नागुर्डेकर यांची ग्रामपंचायतकडे निवदनाद्वारे मागणी
बेळगाव : राजहंसगड गावात मागील कित्येक दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे, गावात जवळपास 200 हून अधिक भटकी कुत्री फिरत आहेत. कोणताही अनुचित प्रकार अथवा जिवितहानी घडण्यापूर्वी कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी शंकर नागुर्डेकर यांनी ग्रामपंचायतकडे निवदनाद्वारे मागणी केली आहे. या कुत्र्यांमुळे गावातील नागरिक व लहान मुलांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
तसेच गावात माशा व डासांचाही प्रादुर्भाव वाढला आहे त्यासाठी फवारणी करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta