बेळगाव : जायंटस ग्रुप ऑफ बेलगाम प्राइड सहेली यांनी बेळगावमध्ये वाढते प्रदूषण बघून आज कॉलेज रोडपासून संभाजी चौक सर्कल पर्यंत बाईक रॅली काढली. प्रत्येकाने आपल्या बाईकवर सेव पल्युशन बॅनर लावले होते. बाईक रॅलीची सुरुवात अतुल पुरोहित पासून केली व सांगता संभाजी चौकात झाली. सुरुवातीला प्रार्थना झाली. बाईकमुळे होणारे प्रदूषण थांबवावे याकरता बाईकची नेहमी तपासणी करावी पीयुसी करावे. बाईकमुळे प्रदूषण होऊ नये याची काळजी कशी घ्यावी याची माहिती अध्यक्ष आरती शहा यांनी दिली.
संभाजी चौकात सांगता झाली. तेथे उपस्थित असलेल्या सर्व बाईकवाल्यांना बाईक संबंधीची काळजी घेणारी परिपत्रके वाटण्यात आली. या कार्यक्रमाला जिग्ना शहा, मंदालसा चौगुले, रूपा मंगावती, श्रुती मेहता, पवन राजपूत, अश्विनी रोकडे आदि सहेलीच्या सदस्या उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta