
बेळगाव : पाटील गल्ली येथील श्री शनेश्र्वर मंदिरतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त झेंडा वंदन करण्यात आले. त्या निमित्त पाटील गल्ली येथील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना जिलबीचे वाटप करण्यात आले. पूजारी आणि ट्रस्टी आनंद अध्यापक यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी रमेश करविनकोप, ज्ञानेश्वर बिर्जे, गुरव व परिसरातील व्यापारी उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त श्री शनेश्र्वर मंदिरात विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराचे ट्रस्टी प्रकाश अध्यापक, विलास अध्यापक, श्रीकांत अध्यापक, कैवल्य अध्यापक आणि भक्त मंडळी यावेळी उपस्थित होती. समस्त जगाचे कल्याण व्हावे, अशी प्रार्थना मंदिरात करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta