
बेळगाव : येथील नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थान तिसऱ्या सोमवारी अमरनाथाची बर्फाची पिंडी साकारण्यात आली. त्यानिमित्त आज सोमवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी मंदिरात श्रावण सोमवार निमित्त लघुरुद्राभिषेक करण्यात आला. तसेच मंदिरात केलेल्या संकल्पनेप्रमाणे यावर्षी बारा ज्योतिर्लिंगामधील दहावा ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर साकारण्यात आला होता. तसेच वैष्णव देवीची स्थापना देखील करण्यात आली.
यावेळी भाविकांनी मंदिरात साकारलेल्या अमरनाथ बर्फाची पिंडी, वैष्णवदेवी आणि दहावा ज्योतिर्लिंग त्रंबकेश्वराचे दर्शन घेतले यावेळी दुपारी बारा वाजता आरती करण्यात आली तसेच आणि रात्री आठ वाजता महाआरती होणार आहे.
याप्रसंगी दादा अष्टेकर भक्त मंडळ आणि कुटुंबीयांनी दादा महाराज अष्टेकर यांनी केलेला ज्योतिर्लिंगाचा संकल्प पूर्ण केला असल्याचे सांगितले, तसेच 12 ज्योतिर्लिंग संकल्प पूर्ण करून अति रुद्र करून या संकल्पाची सांगता करणार असल्याचे देखील सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta