बेळगाव : आरोग्य भारती बेळगावतर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त दि. 15 रोजी ध्वजवंदनाचा सोहळा पार पडला.
आरोग्य भारतीचे बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष श्री. गोपाळराव देशपांडे व सुनीता देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी आरोग्य भारतीचे विभाग संयोजक वासुदेव इनामदार यांनी अमृत महोत्सवाचे महत्त्व व प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य अधोरेखित केले.
त्यानंतर आरोग्य भारतीचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद हलगेकर यांनी भारताचे स्वातंत्र्य व त्यासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिवीरांबद्दल माहिती दिली. दि. 14 रोजी आयोजित सदृढ बालक स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. त्यांच्या पालकांचेही अभिनंदन करण्यात आले.
विजेते असे : गट तीन ते 7 वर्षे
1) संचित देशपांडे, 2) अदम्या देसाई, 3) स्पृहा इनामदार, 4) प्रयांशी मजूकर, 5) नैतिक पाटील.
Belgaum Varta Belgaum Varta