बेळगाव : शास्त्रीनगर येथील दि. आदर्श एज्युकेशन सोसायटी संचालित ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनाचे सोहळा पार पडला. यावेळी श्रीमाता सहकारी सोसायटीचे चेअरमन मनोहर देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच शाळेच्या प्रशासक भक्ती देसाई यांच्या हस्ते विविध प्रतिमांचे पूजन करण्यात आले. शाळेच्या प्राचार्य अलका जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा सादर करून उपस्थित मान्यवरांना वंदन केले. प्राथमिक विभागाच्या प्रमुख फरीदा मिर्झा यांच्या नेतृत्वाखाली तीनशे विद्यार्थ्यांनी सामूहिक नृत्याचा आविष्कार घडविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची व आराध्या यांनी केले. भक्ती देसाई यांनी आपले विचार मांडले आणि पालकवर्गाचे कौतुक केले. कार्यक्रमात विद्यार्थी पालक आणि शिक्षक वर्ग संख्येने उपस्थित होता.
Belgaum Varta Belgaum Varta