बेळगाव : आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने सगळीकडे आजादी का अमृत महोत्सव हा सगळीकडे साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जायंटस प्राईड सहेली व व जायंट्स परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने भातकांडे केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये एक ऑगस्ट ते सहा ऑगस्ट पर्यंत देशभक्तीवर गायन, भाषण, चित्रकला, फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्याचा बक्षीस समारंभ 13 ऑगस्ट रोजी भातकांडे केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये पार पडला.
बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावरती प्राईड सहेलीचा अध्यक्ष आरती शहा, जायंटस परिवारचे अध्यक्ष श्रीधन मलिक, फेडरेशन संचालक राजू माळवदे, भातकांडे स्कूलच्या चेअरमन मधुरा भातखंडे, माजी मुख्याध्यापिका दया शहापूरकर, केंब्रिज स्कूलच्या प्रिन्सिपल साजिया मॅडम उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. त्यानंतर मुलांनी देशभक्तीपर डान्स आणि एक लघु नाटिका सादर केली. यावेळी मधुरा मॅडम, दया मॅडम, आरती मॅडम, श्रीधन सर यांनी आपले विचार व्यक्त केले.
प्रिन्सिपल साजिया मॅडमनी स्कूलमधील उपक्रमाची माहिती दिली. त्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये बक्षीस मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिक्षिका वृंदा कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाला शाळेचा शिक्षक वर्ग तसेच सहेलीच्या जिग्ना शहा, पूजा पाटील परिवारतर्फे प्रवीण त्रिवेदी, राजू गुंडकल व इतर सदस्य उपस्थित होते.