
बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिराच्या वतीने शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त संपूर्ण मंदिर आकर्षकरित्या विद्युत रोषणाई, विविध फुलां-पानांपासून सजविण्यात आले होते. रविवारी रात्री 12 वाजल्यापासून पंचामृत अभिषेक पहाटे पाच वाजेपर्यंत करण्यात आले. त्यानंतर एकादश रुद्राभिषेक करण्यात आला. श्रावण सोमवार निमित्त मंदिरामध्ये त्रिकाल पूजेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी पालखी प्रदक्षिणा करून महाआरती करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta