बेळगाव : केपीटीसीएलच्या कनिष्ठ सहाय्यक परीक्षा बेकायदेशीर प्रकरणाची गंभीर दखल घेतलेल्या एसपी डॉ. संजीव पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाला 9 जणांना अटक करण्यात आले आहे.
बेळगावचे एसपी डॉ. संजीव पाटील यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने प्रकरणाच्या मुळापर्यंत जात 9 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
गेल्या 7 ऑगस्ट रोजी केपीटीसीएलने कनिष्ठ सहाय्यक पदासाठी स्पर्धा परीक्षा घेतली होती. परीक्षा सुरू असताना 13 उमेदवारांनी गैरमार्गाचा अवलंब करून उत्तरे लिहिल्याच्या माहितीचा पोलिसांनी पाठपुरावा केला. परीक्षेतील गैरप्रकारांचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी दोन पथके स्थापन केली आहेत. गोकाक जीएस कॉलेजच्या परीक्षा केंद्रात अनियमितता झाल्याचे सांगण्यात येत असून पोलिसांनी तपास केला आहे. यावेळी सिद्धप्पा मडिहळ्ळी नावाच्या परीक्षार्थींने स्मार्ट घड्याळाचा वापर करून परीक्षेत गैरप्रकार केल्याची माहिती उघड झाली आहे.या आरोपीने स्मार्ट वॉचवरून प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून तो टेलिग्राम ऍपद्वारे दुसर्या आरोपीला पाठवला. दुसर्याने तिसर्याला पाठवला. या तिसर्या आरोपीला पोलिसांनी अटक करून त्याची चौकशी केली. त्यात ब्ल्यू टूथ डिव्हाईसचा वापर करून परीक्षेत गैरप्रकार केल्याची माहिती समोर आली आहे. हुक्केरी तालुक्यातील बीके शिरहट्टी गावातील एका फार्म हाऊसवर पोलिसांनी छापा टाकला. या घरात बसून आरोपींनी अनेकांना ब्ल्यू टूथवर उत्तरे पुरविल्याची माहिती मिळाली आहे. तसेच गदग मनपा पीयू कॉलेज केंद्राची प्रश्नपत्रिका आरोपीकडे उपलब्ध होती. प्रश्नपत्रिका फोडणार्या पिता-पुत्राला बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे. या प्रश्नपत्रिकेच्या आधारे परीक्षेदरम्यान आरोपींनी या ब्लू टूथद्वारे उमेदवारांना उत्तरे पुरविल्याची माहिती आहे. परीक्षेत गैरप्रकार प्रकरणाचा पाठपुरावा करणारे बेळगावचे एसपी डॉ. संजीव पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाला यापूर्वीच 9 आरोपींना अटक केली आहे. परीक्षा प्राधिकरणाकडे या प्रकरणाचा सर्वंकष अहवाल सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta