Saturday , October 19 2024
Breaking News

‘नारायणी’ची सुरेल संगीत सभा

Spread the love

बेळगाव : राग-रागिण्यांची झाली बरसात
तबला-संवादिनीची झकास साथ
चिंब, मनविभोर श्रावण
डोलले अवघे श्रोतृजन
बेळगाव शांतीनगरातील संगीत शिक्षक गुरुराज कुलकर्णी संचालित नारायणी संगीत विद्यालय आणि पं. बी. व्ही. कडलास्कर बुवा जन्मशताब्दीनिमित्त संगीत सभा कार्यक्रम सरस्वती वाचनालयाच्या सभागृहात दि. 21 रोजी पार पडला. याला स्मृती समारोह समितीचे सहकार्य लाभले होते. यामध्ये विविध विद्यार्थी व काही लोकप्रिय गायकांनी व वादकांनी सहभाग घेऊन ही सभा सुरेल बनविली.
संगीत शिक्षक तसेच कलाकार संघाचे अध्यक्ष नंदन हेर्लेकर व पं. राजप्रभू धोत्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. पांडुरंगाचार्य पुजार यांनी दीपमंत्र म्हटला. यानंतर संगीत सभेची सुरुवात झाली. यामध्ये गायकांनी विविध राग व काही भजने सादर केली. यामध्ये कुमारी कृष्णवेणी पी. पुजार, पांडुरंग गवाळकर, दिग्विजय होंगल, योगेश रामदास, सान्वी जगवाले, संजीवनी हुक्केरी, शरदी हेगडे, विजय बांदिवडेकर, सीमा कुलकर्णी, गुरुराज कुलकर्णी यांनी संगीत सेवा सादर केली. हुक्केरी हिने राग दुर्गा तर ज्येष्ठ गायिका सीमा कुलकर्णी यांनी राग रागेश्री सादर केला. बांदिवडेकर यांनी अनवट असा राग गावती सादर करुन भजन म्हटले. योगेश रामदास आणि दिग्विजय होंगल यांनी अप्रतिमपणे गायन सादर करुन रसिकांची वाहवा मिळविली. यानंतर संगीत शिक्षक गुरुराज कुलकर्णी यांनी राग जोग गायिला. भैरवीमध्ये त्यांनी भक्तिगीत सादर करुन सभेची सांगता केली.
या कलाकारांना मुकुंद गोरे, गुरुराज कुलकर्णी, योगेश रामदास, प्रयाग बोंगाळे यांनी संवादिनीची साथ केली. तसेच जितेंद्र साबण्णावर, विशाल मोडक, श्रावण लाड यांनी तबल्याची साथसंगत केली. कुलकर्णी यांनी स्वागत केल्यानंतर शेवटी आभार मानले. पत्रकार सुनील आपटे यांनी सूत्रसंचालन केले.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *