Thursday , March 5 2026
Breaking News

विजापूर- हुबळी राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण ठार

Spread the love

 

अंकली (प्रतिनिधी) : विजापूर -हुबळी या राष्ट्रीय महामार्गावर राज्य परिवहन महामंडळाची बस दोन कार यांच्यात झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री कोल्हार तालुक्यातील कडपट्टी गावाजवळ घडली सदर अपघातात ठार झालेले गुलबर्गा येथील रहिवासी जहअसून या घटनेची नोंद कोल्हार पोलिस स्थानकात झाली असून पुढील तपास सुरू आहे

याबाबत समजलेली माहिती अशी की, काल गुलबर्गा येथील रहिवासी घरी गणेश प्रतिष्ठापना करून परत हुबळीकडे जात असताना विजापूर जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यातील कडपट्टी येथे राज्य परिवहन महामंडळाची बस व कारगाडी यांच्यात झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला घटनास्थळी दोघांचा मृत्यू तर एकाचा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेत मृत्यू झाला. गुलबर्गा येथील सुनंदा मल्लिकार्जुन कलशेट्टी (वय २५) व त्यांची मुलगी सुमन मल्लिकार्जुन कलशेट्टी (वय ३) यांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झालेले शरनमा बसवराज कलशेट्टी (वय ५५) त्यांना उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेत मृत्यू झाला तर उमेश कलशेट्टी व सुरेखा कलशेट्टी हे दोघेजण गंभीर जखमी झाला असून त्यांना उपचारासाठी विजापूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी कोल्हार पोलीस स्थानकाचे फौजदार प्रीतम नाईक भेट देऊन पुढील तपास सुरू ठेवला आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *