Monday , April 20 2026
Breaking News

जिल्हा प्रशासनातर्फे बाप्पाची प्रतिष्ठापना!

Spread the love

 

बेळगाव : जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज गणेश चतुर्थी दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील पर्यावरण पूरक शाडू मातीची श्री गणेश मूर्ती आणण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी नितेश पाटील कित्तूर चन्नम्मा चौक श्री गणेश मंदिर येथील मूर्तिकाराकडे गेले होते. तेथे बाप्पाच्या मूर्तीला मांडीवर बसवून घेऊन आपल्या कारगाडीतून जिल्हाधिकारी पाटील आपल्या कार्यालयाकडे आले. त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांसह अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जगदीश यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

About Belgaum Varta

Check Also

शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

Spread the love  ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या गजरात आजपासून बेळगाव होणार शिवमय; शिवज्योतीच्या आगमनाने उत्साह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *