Saturday , October 19 2024
Breaking News

आर्यादुर्गा संगीत विद्यालयातर्फे पांडोबा बोंद्रे यांचा स्मृतीदिन

Spread the love

बेळगाव : ज्येष्ठ पखवाजी हभप यशवंत बोंद्रे संचालित आर्यादुर्गा संगीत विद्यालयात मृदुंगाचार्य पांडोबा बोंद्रे यांचा स्मृतीदिन दि. 4 रोजी शहापूर कचेरी गल्ली येथे पार पडला. यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वादनाचे उत्कृष्ट सादरीकरण केले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.
श्री. दिलीप माळगी, प्रणव पित्रे, प्रिया कवठेकर, लक्ष्मण जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. श्री. माळगी यांनी श्री. यशवंत बोंद्रे यांच्या कार्याचे कौतुक केले. श्री. वासुदेव इनामदार यांनी श्री. बोंद्रे यांच्या संघातील घोष विभागातील कार्याला उजाळा दिला. पं. राजप्रभू धोत्रे व प्रिया कवठेकर यांनीही शुभेच्छा व्यक्त केल्या.
श्रुती धारपवार, श्रावणी गुंजीकर, ऋतुजा हेरेकर यांचे सामूहिक तबला वादन झाले. यात त्रिताल, कायदा, पलटे व मुखडे प्रस्तुत केले. शशांक बोरकर, पवन धोत्रे, वैभव गाडगीळ, प्रथमेश जोशी, अविनाश भाटी, निहाल कारेकर व बालकलाकार अनय पित्रे यांनी तबलावादन करून चुणुक दाखवली. महिला तबलावादक सुषमा पाटील, हरिष गोंदकर यांनी सतारवादन व विभव जोशी, विश्वंभर जोशी यांनी अभंग गायिल्यानंतर भैरवीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. सुधीर बोंद्रे, गिरीश जोशी, दिनेश वाळवे (असोगा), लक्ष्मण जोशी यांनी परिश्रम घेतले. आर्यादुर्गा संगीत विद्यालय गेल्या 20 वर्षांपासून संगीताचे ज्ञान देत आहे.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *