Wednesday , March 4 2026
Breaking News

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान तरुणाची हत्या

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील मुरगोड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मुगळीहाळ येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत एका तरुणाचा भोसकून खून करण्यात आला आहे.
अर्जुन गौड (21) असे चाकूने वार केल्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटात हाणामारी झाली, यादरम्यान एका व्यक्तीने
अर्जुन गौड याच्या छातीत वार करण्यात आले असता तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी उदय भद्रोळी (21), सुभाष सोलन्नवर (21), विठ्ठल मिशी (20) आणि अन्य एका अल्पवयीन मुलासह चार जणांना अटक केली आहे. जुन्या वादातून ही घटना घडली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *