Wednesday , March 4 2026
Breaking News

राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडून स्व. उमेश कत्ती कुटुंबियांचे सांत्वन

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटकचे माननीय राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी नुकतेच निधन झालेले मंत्री उमेश कत्ती यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
हुक्केरी तालुक्यातील बेल्लद बागेवाडी येथील उमेश कत्ती यांच्या निवासस्थानी बुधवारी (14 सप्टेंबर) राज्यपालांनी भेट दिली.
यावेळी स्व. उमेश कत्ती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यानंतर उमेश कत्ती यांच्या पत्नी शीला कत्ती यांचे त्यांनी सांत्वन केले.
यावेळी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, माजी खासदार डीसीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती आणि मुलगा निखिल कत्ती उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेक्कीनकेरे येथे शेतकरी महिलेवर हल्ला; गावकऱ्यांचा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेक्कीनकेरे येथे मंदिराच्या जागेत वैरण ठेवल्याच्या कारणावरून एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *