Thursday , March 5 2026
Breaking News

केपीटीसीएल परीक्षा गैरप्रकारातील आणखी तीन आरोपी अटकेत

Spread the love

 

बेळगाव : केपीटीसीएलच्या परीक्षेतील गैरप्रकारांचे जाळे दिवसेंदिवस खोलवर जात आहे. बेळगाव जिल्हा पोलीस विभागाकडून एकेक आरोपींना अटक करण्यात येत आहे. आज आणखी तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश
आले.
बेळगावचे एसपी डॉ. संजीव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी या प्रकरणी यापूर्वीच १७ आरोपींना अटक केली असून आजपर्यंत अटक केलेल्यांची संख्या 20 झाली आहे.
अक्षय दुंडाप्पा भंडारी (वय 33, रा. अरभागवी), बसवराज रुद्रप्पा दुंदनट्टी (वय 34, रा. बिरंगड्डी) तसेच श्रीधर लक्काप्पा कट्टीकर (वय 22, रा. राजापूर) अशी आरोपींची नावे आहेत. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *