बेळगाव : नवरात्रोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीखातर बेळगाव-सौंदत्ती मार्गावर तब्बल 7 अतिरिक्त बस सोडल्या जाणार आहेत. सोमवारपासून ही अतिरिक्त बससेवा सुरु केली जाणार आहे, अशी माहिती परिवहनचे विभागाचे नियंत्रण अधिकारी पी. वाय. नाईक यांनी दिली.
नवरात्रोत्सव काळात सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी जाणार्या भाविकांची संख्या अधिक असते. दरम्यान प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन खात्याने अतिरिक्त 60 बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी यात्रा-जत्रा, पर्यटन आणि इतर विशेष कार्यक्रमांसाठी परिवहनकडून जादा बस सोडल्या जातात. त्याबरोबर यंदा देखील सौंदत्ती यात्रेसाठी जादा बस धावणार आहेत. शिवाय प्रवाशांच्या सोयीखातर विनाथांबा बससेवा देखील धावणार आहे. दरम्यान नवरात्रोत्सव काळात प्रवाशांची मागणी वाढल्यास पुन्हा जादा बस सोडण्याचा निर्णय देखील परिवहनाने घेतला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta