Sunday , September 20 2026
Breaking News

दसरा सणासाठी उत्सव स्पेशल रेल्वे

Spread the love

 

बेळगाव : दसरा सणासाठी नैऋत्य रेल्वेने उत्सव स्पेशल रेल्वे सुरू केली आहे. यशवंतपूर बेळगांव यशवंतपूर अशी ही उत्सव स्पेशल रेल्वे धावणार आहे. त्यामुळे दसरा कालावधीत रेल्वेला होणारी गर्दी टाळता येणार असून प्रवाश्यांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
नोकरीनिमित्त बेंगलोर येथे वास्तव्यास असणारे अनेक नागरिक गावी परतात. त्यामुळे रेल्वेला गर्दी होत असल्यामुळे प्रवाश्यांचा आर्थिक भुर्दंड सहन करत खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागतो. प्रवाश्यांचा ही अडचण ओळखून बेंगलोरचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी उत्सव स्पेशल रेल्वे सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार नैऋत्य रेल्वेने उत्सव स्पेशल ही जादाची रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
यशवंतपूर बेळगांव रेल्वे क्रमांक (06505) ही रेल्वे शुक्रवार दि. 30 रोजी बेंगलोर यशवंतपूर येथून रात्री 9.30 वाजता निघणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 8.05 वाजता बेळगांव रेल्वे स्थानकात पोहोचेल तर शनिवार दि.1 ऑक्टोबर रोजी बेळगांव यशवंतपूर रेल्वे क्रमांक (06506) रात्री 10 वाजता बेळगांव स्थानकातून निघालेली रेल्वे सकाळी 8.50 ला यशवंतपूर स्थानकात पोहोचेल.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *