Wednesday , March 4 2026
Breaking News

येळ्ळूर ग्राम पंचायतच्यावतीने विविध विकासकामांचे उद्घाटन

Spread the love

 

बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतच्यावतीने ग्राम पंचायतीच्या 15 व्या आयोगातून निधी मंजूर करून येळ्ळूर येथील विविध विकासकामांना प्रारंभ करण्यात आला. येळ्ळूर येथील पाटील स्मशानभूमी, बाराभाव (विहीर), एससी स्मशानभूमी, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर समुदाय भवन व उद्यान विकासकामांचे ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करून सुरुवातीला पाटील स्मशानभूमीमध्ये पेव्हर्स बसवण्याच्या कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
त्यानंतर गावातील प्रचलित असलेली बाराभाव विहीर या ठिकाणी फिल्टर बसवण्यात आल्याने पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे, त्यामुळे इथे भरपूर लोक पिण्याचे पाणी घेण्यासाठी येत असतात पण या लगतचा परिसर स्वच्छ नसल्याकारणाने तेथून पाणी घेऊन जाण्यासाठी लोकांना अडचण निर्माण झाली होती ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी हा परिसरही स्वच्छ करण्याची मोहीम राबविली. तसेच येथे टाईल्स बसवण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर एससी स्मशानभूमीमध्ये पेव्हर्स बसवणे तसेच पिण्याच्या पाण्याची सोय आदी विकासकामांना सुरुवात करून येळ्ळूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समुदाय भवन व उद्यान गार्डनला पेव्हर्स बसवणे तसेच गार्डनिंग आदी कामांचे उद्घाटन ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील आणि पीडीओ तसेच गावातली ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यापुढेही गावातील इतर विकासकामांना प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातून कामे हाती घेण्यात येतील, असे यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील यांनी सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर, सदस्य रमेश मेणसे, प्रमोद पाटील, जोतिबा चौगुले, अरविंद पाटील, कलाप्पा मेलगे, शिवाजी नांदूरकर, शशीकांत धुळजी, राजू डोण्ण्यानावर, सदस्या रूपा पुण्ण्यानावर, मनीषा घाडी,
सेक्रेटरी सदानंद मराठे, गावातील ज्येष्ठ नागरिक बाबुराव पाटील, हणमंत ब. पाटील, वसंत ग. पाटील, मनोहर पाटील, शंकर पाटील, पांडुरंग पाटील, चंद्रकांत पाटील, अनिल पाटील, सुरेश पाटील, बाळाजी पाटील, शिवाजी पाटील, तसेच
लक्ष्मण हुवांनावर, रूक्मान्ना हुवांनावर, नारायण ताशीलदार, महेश ताशीलदार, प्रमोद सूर्यवंशी, सुनील कांबळे, भीमराव पुण्यान्नावर, सुनिल कांबळे, लक्ष्मण हुवांनावर, शशिकांत हुवांनावर, परशराम ताशीलदार आणि कॉन्ट्रॅक्टर विनायक शिवाजी पाटील तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *