येळ्ळूर ग्राम पंचायतच व येळ्ळूरमधील सर्व शाळांच्यावतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर
बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतकडून जिल्हाधिकारी यांना येळ्ळूर ग्राम पंचायत सदस्यांनी व सर्व शाळांच्या शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, येळ्ळूर हद्दीत येणार्या सर्व शाळांजवळील मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसविणे व सिग्नल बोर्ड बसविणे आणि नंदिहळ्ळी, देसुर आणि गर्लगुंजी येथून येणारी विटा, वाळूची वाहने फार वेगाने ये-जा करत असतात. यामुळे मुलांच्या जीवाला धोका निर्माण होत असून यापूर्वीही मान्य. सहायक कार्यनिर्वाहिक इंजिनीअर यांना यापूर्वीही दोन वेळा निवेदन दिले असून याबद्दल कोणतीही अमलबजावणी झाली नाही म्हणून ग्राम पंचायत व हायस्कूल, प्रायमरी, अंगणवाडी या सर्वांच्या वतीने मा.अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांना निवेदन देण्यात आले. तसेच निवेदनामध्ये मुख्य रस्त्यावरुन जाणार्या वाहनांना सकाळी 8.00 ते 10:30 वाजेपर्यंत व सायंकाळी 4:00 ते 5:30 वाजेपर्यंत ही अवजड वाहने बंद ठेवण्यात यावीत किंवा अन्य मार्गाने वाळवावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील, ग्राम पंचायत सदस्य प्रमोद पाटील, शिवाजी नांदूरकर, रमेश मेनसे, परशराम परीट, राकेश परीट, जोतिबा चौगुले, दयानंद उघाडे, कल्लाप्पा मेलगे, शशीकांत धुळजी, अरविंद पाटील, राजू डोंन्यानावर, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक, मुख्याध्यापक पी. बी. कांनशीडे, जे. पी. धामणेकर, सौ. के. बी. पोटे, सौ. लता बस्तवाडकर, मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर, एस. बी. मजूकर, हेमंत लोकळूचे, प्रशांत सुतार, नारायण पाटील, सौ. कनुकले, सौ. हुर्दनमठ, मुख्याध्यापक एस. आर. निलजकर, के. डी. पाटील, एस. आर. आरेर, एम. एल. हांडे, एम. एस. मंडोळकर, एस. एस. बाळेकुंद्री, एस. बी. दुरगुडे, एस. पी. पाखरे, एस. पी. पाटील, एस. वाय. मेनसे, एम. वाय. कडलीकर, हेमवती आय. बी., रेणुका अलनावर, श्रुष्टी सुप्पनवर, सौ. अश्विनी कडबी, रेश्मा एस. अनगोळ आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta