बेळगाव : श्री मळेकरणी क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित, उचगांव या सोसायटीच्यावतीने विविध पुरस्कार व सत्कार सोहळा शंकर-पार्वती कार्यालयात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक चेअरमन श्रीमान जवाहरराव शंकरराव देसाई होते. प्रास्ताविक व स्वागत सोसायटीचे व्हा. चेअरमन अॅड. अनिल पावशे यांनी केले.
कार्यक्रमात साहित्य भूषण पुरस्कार अॅड. नितीन धोंडीबा आनंदचे व कल्लाप्पा ज्योतिबा पाटील यांना देऊन सन्मानित करण्यात आले व शिक्षक भूषण पुरस्कार श्री. लक्ष्मण विठ्ठल शिंदे व नामदेव परसराम पाटील यांना देण्यात आला. उचगाव भूषण पुरस्कार श्री. बसवंत नागो बेनके यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
भारत स्वतंत्र होऊन 75 वर्षे पूर्ण झाली. अमृत महोत्सवाचे औचित साधून ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक गुरुवर्य परशुराम नंदिहळ्ळी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक अर्जुन यल्लूप्पा पाटील, रामचंद्र जोतिबा डोेणकरी यांचाही सत्कार करण्यात आला.
नीट परीक्षेत देशात चौथा व राज्यात दुसरा क्रमांक मिळविलेल्या ऋचा मोहन पावशे हिचा, कोरोना योद्धे म्हणून उचगाव गावातील सर्व डॉक्टरांचा व आशा कार्यकर्त्यांचाही सत्कार करण्यात आला. निवृत्त शिक्षिका चंद्राताई म्हेत्री, एन. ओ. चौगुले, गंगाराम तुप्पट तसेच आदर्श शिक्षक एन. एस. बोकडे, छबुताई पाटील, श्वेता बापूसो देसाई तसेच विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा व दहावी उचगाव केंद्रात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास सोसायटीचे संचालक सुरेश राजूकर, किशोर पावशे, पवन देसाई, निळकंठ कुरबर, लुमाण्णा पावशे, चंद्रकांत देसाई, रमेश घुमटे, विजयराव नंदिहळ्ळी, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सदस्य, सोसायटीचे सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण देसाई व प्रवीणा देसाई यांनी केले तर आभार सोसायटीचे सेक्रेटरी के. एन. कदम यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta