बेळगाव : बाकनूर (ता. बेळगाव) महर्षी वाल्मिकी जयंती बाकनूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग प. नाईक होते.
प्रारंभी वाल्मिकी फोटो पूजन बेळवट्टी ग्रा.पं अध्यक्ष म्हाळू मजकूर यांच्याहस्ते करून अभिवादन करण्यात आले
यावेळी अशोक मजकूर, पांडुरंग नाईक, रवळू गोडसे यांनी विचार व्यक्त करुन महर्षी वाल्मिकींच्या चरित्राची महती कथन केली.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून अध्यक्ष म्हाळू मजकूर, रवळू गोडसे (अध्यक्ष-शाळा सुधारणा कमिटी), बारकू नाईक, रेश्मा कुलम (सदस्या ग्राम.पंचायत) यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आम. सतीश जारकिहोळी यांच्याकडून रू. दहा हजार व आमदार लक्ष्मी हेबाळकर यांच्याकडून पाच हजार रुपये महाप्रसादसाठी देणग्या वाल्मिकी मंडळाला मिळाल्या.
यावेळी गावातील भरमू गोडसे, निंगो कुलम, नामदेव गोडसे, रामलिंग सावंत, प्रकाश नाईक, सुरेश नाईक, कृष्णा नाईक, शिवाजी नाईक, महादेव नाईक, रामू नाईक, वासुदेव नाईक, रघुनाथ नाईक, दीपक नाईक, नाना मजकूर, अमोल मेणसे, मोनाप्पा नाईक, टोपाना नाईक, रामू मजकूर, काळू नाईक, हणमंत नाईक, संदीप नाईक आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी आभार परशराम रा. नाईक यांनी मानले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले
Belgaum Varta Belgaum Varta