Thursday , March 5 2026
Breaking News

मांजाने घेतला कोवळ्या बालकाचा जीव

Spread the love

 

बेळगाव : कोवळ्या मुलाचा पतंगाच्या मांजाने बळी घेतल्याची दुर्दैवी घटना आज सायंकाळी बेळगावातील जुने गांधीनगर येथे घडली.
दिवाळी सणानिमित्त बेळगावच्या बाजारपेठेत कपडे खरेदी करून वडगाव येथील मामाच्या घरी भेट देऊन नंतर वडिलांसोबत दुचाकीवरून आपल्या गावी हत्तरगी येथे जाणाऱ्या 6 वर्षीय बालकाचा घातक मांजाने बळी घेतला. गळ्यात पतंगाचा धारदार मांजा लागल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. वर्धन इरण्णा बाली असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. त्या कुटुंबावर मुलाच्या अशा दुर्दैवी मृत्यूने शोककळा पसरली आहे. याप्रकरणी माळमारुती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *