
संबंधित मंदिर प्रशासनाकडे धनादेश सुपूर्द
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून आ. लक्ष्मी हेब्बाळकर आमदार निधीतून मतदारसंघातील मंदिरांसाठी आर्थिक मदत देत आहेत. याचाच एक भाग म्हणून आज शनिवारी आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते मोदगा येथील हनुमान मंदिर आणि माविनकट्टीतील रेणुकाचार्य मंदिरासाठी आर्थिक मदतीचा धनादेश संबंधित मंदिर प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला.
मोदगा गावातील हनुमान मंदिराच्या कम्युनिटी हॉलच्या बांधकामासाठी आमदार निधीतून 5 लाख रु. अनुदान मंजूर करण्यात आले असून आज मंदिर प्रशासनाला आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले.
यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, देवस्थान कमिटीचे पदाधिकारी आणि सदस्य, कांचन नाईक, नम्रता काळे, बसवराज कल्लूर, शिवानंद राजगोळी, मंजुनाथ तुक्कार, शिवाजी हडकर,ओमाण्णा खडकर, बसवण्णा मुगळी, सुभाष हेगडे, मंगला अनंत तारिहाळकर यांच्यासह प्राथमिक शाळेचे शिक्षक-शिक्षिका एसडीएमसी सदस्य, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. तर माविनकट्टी गावातील श्री रेणुकाचार्य मंदिराच्या कम्युनिटी हॉलच्या बांधकामासाठी आमदार निधीतून 3.50 लाख रु. अनुदान मंजूर करण्यात आले असून आज मंदिर प्रशासनाला आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक, देवस्थान कमिटीचे विश्वस्त शंकरगौडा पाटील, स्थानिक लोकप्रतिनिधी, गावातील महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta