Monday , September 21 2026
Breaking News

विद्युत वाहिनीच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

Spread the love

 

अथणी : बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथे विद्युत वाहिनीच्या दुरुस्तीदरम्यान विजेचा धक्का लागून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

येथील बाळेगिरी गावात बाळेगिरी-बेवनूर हेस्कॉम लिंक लाईनचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. अशोक मल्लाप्पा माळी (वय 35) व हणमंत हलाप्पा मगदूम (वय 36) यांचा मृत्यू झाला.
दोघेही रायबाग तालुक्यातील हिडकल गावातील आहेत. हेस्कॉमच्या बेजबाबदारपणामुळे या दोन कामगारांचा मृत्यू झाला असल्याने संबंधितांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.
बेळगावचे जिल्हा पोलिस प्रमुख संजीव पाटील म्हणाले की, संबंधित हेस्कॉम अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईल.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *