बेळगाव : भारतीय निवडणूक आयोगाने छायाचित्रासमवेतच्या मतदार यादीत किरकोळ दुरुस्तीसाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. तक्रारी दाखल करण्याची अंतिम मुदत 8 डिसेंबर असून तक्रार निवारण 26 डिसेंबरला होणार आहे. तर अंतिम यादी 5 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. यासाठी 4 डिसेंबरपर्यंत जनजागृती केली जाणार आहे, असे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी काळविले आहे.
1 जानेवारी 2023 ला 18 वर्षे पूर्ण झालेल्या व 18 वर्षावरील लोकांना आपल्या विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी अर्ज नमुना 6 मतदार यादीतून नाव वगळणे किंवा रद्द करण्यासाठी अर्ज नमुना 7 मतदार यादीतील नावात दुरुस्ती पत्ता बदलणे दिव्यांग असल्यासंबंधी नोंद व मतदारपत्राच्या नमुन्यांसाठी अर्ज नमुना 8 सादर करण्याचा आहे. कच्ची यादी मतदार यादी 9 नोव्हेंबर पासून जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात तसेच निवडणूक अधिकारी बेंगळुरू website:ceokarnataka.kar.nic.in वर उपलब्ध असेल. मतदार यादीत नाव असलेल्यानी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही असे कळविले आहे. मतदारांना VOTER HELPLINE APP (VHA) हे अप व WWW.NVSP.in ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. व्हीएचए गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून घ्यायचे आहे. ऍप व WWW.NVSP.in या वेबसाईटद्वारे अर्ज नमुना 6,7,8 सादर करण्यास भारतीय निवडणूक आयोगाने संधी उपलब्ध करून दिली आहे. याचा लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कळविले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta