बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची महत्वपूर्ण बैठक सह्याद्री अतिथीगृहात नुकताच सुरू झाली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे असतील उच्चाधिकार समितीमध्ये 14 नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, यांच्यासह नारायण राणे, चंद्रकांत पाटील यांचा देखील समावेश आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आता सह्याद्री अतिथीगृहामध्ये बैठकीची सुरूवात झाली आहे.
सीमाप्रश्नावर कायद्याच्या चौकटीत राहून नेमका कोणता पर्याय काढता येईल सीमाप्रश्नी नेमका कसा सुटू शकतो यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आज ही महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta