Thursday , June 4 2026
Breaking News

खानापूर-अनमोड रस्ता निकृष्ट दर्जाचा

Spread the love

 

खानापूर (तानाजी गोरल) : खानापूर- रामनगर, अनमोड -गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.४ कायद्याच्या चौकटीत अडकून पडला होता. तो रस्ता आता पुन्हा करण्यात येत आहे. मात्र रस्ता करण्यासाठी मोहरम ऐवजी साधी माती वापरण्यात येत असल्यामुळे या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे सर्वत्र धूळ उडत आहे यामुळे दुचाकीस्वारांना त्रास सहन करावा लागत आहे. याच मातीवर पक्का रस्ता बनविला गेला तर रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे होण्याची शक्यता आहे. साध्या मातीवर केलेला रस्ता एकाच पावसाळ्यात वाहून जाऊन रस्त्यावर खड्डे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित खात्याने तसेच खासदार आनंतकुमार हेगडे यांनी वेळीच लक्ष घालून ठेकेदाराला रस्ता करण्यासाठी सध्या मातीऐवजी मोहरम वापरून रस्ता बनविण्याची सूचना करावी, अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला बेहेरे फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण अभियान

Spread the love  बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला बेहेरे फाउंडेशनच्या वतीने नंदीहळ्ळी जवळील नागेनहट्टी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *