Thursday , March 5 2026
Breaking News

राज्यभरातून सहभागी होणार 56 सीबीएसई शालेय फूटबाॅल संघ

Spread the love

 

बेळगाव : सीबीएसई 19 वर्षाखालील क्लस्टर लेवल फुटबाॅल स्पर्धा दि. 3, 4, 5 डिसेंबरला लव्ह डेल सेंट्रल स्कूलच्या आयोजित शाळेच्या फूटबाॅल मैदानावर होणार आहे, अशी माहिती शाळेच्या संचालिका प्रेरणा घाटगे यांनी गुरूवारी बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, या स्पर्धेत राज्यभरातून 56 सीबीएसई शालेय संघ सहभागी होणार आहेत.शुक्रवार दि. 2 रोजी सायंकाळी 6 वा. मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन होणार आहे. दि. 3, 4 व 5 रोजी दिवस-रात्र स्पर्धा चालणार आहे. स्पर्धेत बेंगळूर, म्हैसूर, गुलबर्गा, मंगळूर, उडुपी, दावणगिरे, बिजापूर, मंड्या, बिदर, कोप्पळ, बळ्ळारी, चित्रदूर्ग, गदग, रायचूर, शिमोगा, रामनगर, तुमकूर, हुबळी, धारवाड आदि ठिकाणचे 800 हून अधिक फूटबाॅलपटू सहभागी होणार आहेत. सोमवार दि. 5 रोजी सायंकाळी विजेत्यांना पारितोषिक वितरण होणार आहे.
पत्रकार परिषदेला प्राचार्या लक्ष्मी इंचल, क्रीडा शिक्षक बसू अगसगी, विनायक मोरे, कलमेश एच्. उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *