बेळगाव : येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृह विज्ञान महाविद्यालयात मानवी हक्क दिवस एन.एस.एस.,एन.सी.सी. आणि आयक्यूएसीतर्फे आयोजित करण्यात आला होता. या समारंभाला वाणिज्य विभागाच्या प्रा.अर्चना भोसले या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात नँक समन्वय अधिकारी प्रा. एम. आर. तेली यांच्या स्वागत भाषणाने झाली. यावेळी प्रा.अर्चना भोसले प्रमुख अतिथीच्या रूपाने बोलताना म्हणाल्या की, समाजातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राहावे आणि प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगता यावे या उद्देशाने आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस साजरा केला जातो. मानवी हक्काच्या मुळेच मनुष्याला त्याचा अधिकार उचित प्रमाणे प्राप्त करता येतो. यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर यांनी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना, त्याची राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक बाजू मांडली. एन.एस. एस. अधिकारी प्रा. राजू हट्टी यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला डॉ. आरती जाधव, प्रा. सोनाली पाटील, एन.सी.सी. अधिकारी प्रा.शिल्पा मोदकप्पगोळ आणि एन.एस.एस. स्वयंसेवक आणि एन.सी.सी. चे कॅडेट उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta