Monday , September 21 2026
Breaking News

खानापूरात इरफान तालिकोटी ट्राॅफी क्रिकेट स्पर्धा २४ डिसेंबरपासून

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : इरफान तालिकोटी ट्राॅफी टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धा दि. २४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सर्वोदय हायस्कूलच्या पटांगणावर पाचव्यांदा आयोजित करण्यात आली आहे.
विजयी क्रिकेट संघाला पहिले बक्षिस ५५,५५५ रूपये, दुसरे बक्षिस २५,५५५ रूपये, तिसरे बक्षिस ११,५५५ रूपये अशी बक्षिस असुन इतर वैयक्तिक बेस्ट बॅटमनसाठी २०५५ रूपये, बेस्ट बाॅलरसाठी २०५५ रूपये, तर मॅन ऑफ दि मॅच ५,०५५ रूपये, याजबरोबर मॅन ऑफ दि मॅच फायनलसाठी १०५५ रूपये व प्रत्येकी चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे युवा नेते इरफान तालिकोटी यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामधामात बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, गेली पाच वर्षे इरफान तालिकोटी ट्राॅफी क्रिकेट स्पर्धा घेण्यात येत असुन खानापूर तालुक्यातील क्रिकेटपटूना प्रोत्साहित करण्यासाठी व क्रिकेट शौकिनांनी याचा लाभ व्हावा. यासाठी इरफान तालिकोटी ट्राॅफी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे, असे सांगितले.
यावेळी तालुक्यातील क्रिकेट संघानी प्रवेश फी ३५०१ रूपये भरून स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
पत्रकार परिषदेला क्रिकेटपटू बाळू चिनवाल, कुबेर नाईक, वाय. बी. गुपित, महांतेश संगोळी, संतोष मनेरीकर, संतान ब्रिगेझा, दिपक कुडाळे, रोहन खोवरे, शिवाजी मजगावकर, आलेक्स फर्नांडिस, जहिर बेपारी, लालसिंग रजपूत, प्रकाश प्रबळकर, ओमकार रजपूत, कमल गौरव, आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक व आभार श्री. मुजावर यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *