Saturday , December 13 2025
Breaking News

अनिल बेनके टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला 6 जानेवारीपासून प्रारंभ : आ. अनिल बेनके

Spread the love

 

बेळगाव : बेळगावमधील सरदार मैदानावर 6 ते 22 जानेवारी दरम्यान ऑल इंडिया ओपन फुल पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेसाठी देशभरातून संघ बेळगावात येणार असल्याचे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले.
शुक्रवारी शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना आमदार अनिल बेनके म्हणाले की, अनिल बेनके टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या ट्रॉफीचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी मंत्री गोविंद कारजोळ, अश्वत्थ नारायण आदी उपस्थित होते. कोरोनामुळे स्पर्धेचे आयोजन करणे शक्य नव्हते, परंतु आता आम्ही स्पर्धेचे नियोजन करत आहोत. पहिले पारितोषिक 5 लाख, दुसरे बक्षीस 2.5 लाख आणि मालिकावीर ठरणार्‍याला रॉयल एनफिल्ड बाईक देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संपूर्ण स्पर्धेत 48 संघांना परवानगी आहे. आमच्या अपेक्षेनुसार 60 हून अधिक संघ येतील. आतापर्यंत 21 संघांनी नोंदणी केली आहे. दररोज 4 सामने होतील आणि हे सामने 10 षटकांचे असतील . सेमी फायनल आणि फायनल मॅचसाठी 12 ओव्हर्स निश्चित करण्यात आल्या आहेत.
ते म्हणाले की, 5 जानेवारीला मीडिया आणि वकिलांशी ट्रायल मॅच होणार आहे. या स्पर्धेत रणजी खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे. विशेष म्हणजे सरदार मैदानावर सामने होतात. या सामन्यासाठी दररोज 20 हजार प्रेक्षक येणार असून त्यांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

युवा समितीच्या वतीने आयोजित सामान्यज्ञान स्पर्धा यशस्वी करण्याचा बैठकीत निर्धार

Spread the love  महामेळाव्याला आडकाठी आणणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *