निपाणी : येथील भीमनगर येथे युएस एआयडी, केएचपीटी कर्नाटक राज्य आणि लाईट हाऊस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने क्षय रोगासंबंधी जनजागृती कार्यक्रम झाला. लाईट हाऊस फाउंडेशन के एच पी टीचे कम्युनिटी को- ऑर्डीनेटर यांच्याशी संपर्क साधून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
चिदंबर नाईक बशयांच्या वतीने गणेश घस्ती, प्रशांत गोंधळी यांनी, क्षय रोगाची सर्वसाधारण लक्षणे, रोगाचे प्रकार, उपचार पद्धती, औषधे न घेण्याचे दुष्परिणाम, यासाठी घ्यावयाची काळजी, सकस आहार यासंबंधी मार्गदर्शन केले. यावेळी लाईट हाऊस फाउंडेशनचे अध्यक्ष पुंडलिक कांबळे, उपाध्यक्ष विकी कांबळे, सचिव सागर कांबळे, सदस्य प्रशांत कांबळे यांच्यासह विविध महिला बचत गट आणि सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.