Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव कांदा मार्केटमध्ये रस्त्यावर उभारलेला खोका हटवला

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरातील कांदा मार्केटमध्ये रस्त्यावर अतिक्रमण करून रातोरात बसविलेले बेकायदेशीर खोकादुकान आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले. यावेळी काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता. बेळगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रविवार पेठ येथील कांदा मार्केटमध्ये काल रात्री कांही अज्ञातांनी रस्त्यावरच दुकान खोका थाटला होता. रात्री अनधिकृतरित्या रस्त्यावर खोका बसवण्यात येत असल्याचे निदर्शनास येताच हिंदुत्ववादी कार्यकर्ते संजय पाटील यांनी संबंधित अज्ञातांना हटकले. त्यावेळी त्यांनी परवानगी घेऊन आपण हा दुकानाचा खोका बसवत असल्याचे सांगितले. त्यानंतर आज मंगळवारी सकाळी सुमारे 100 हिंदुत्ववादी कार्यकर्ते कांदा मार्केट येथे जमा झाले आणि त्यांनी रस्त्यावर बेकायदेशीररित्या बसविलेल्या दुकानाच्या खोक्याबद्दल संबंधिताना जाब विचारला. तसेच खोक्यासंबंधीच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली. मात्र खोका बसवणाऱ्यांकडून कागदपत्रे दाखवण्यास टाळाटाळ सुरू केल्याने कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली. त्या तक्रारीची दखल घेत आयुक्तांनी तत्काळ त्या परिसराशी संबंधित महापालिकेच्या अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. त्यानंतर मनपा अभियंत्यांनी चौकशीअंती परवानगीशिवाय या पद्धतीने रस्त्यावर दुकानाचा खोका बसवता येणार नाही अशी ताकीद दिली. तसेच पोलीस बंदोबस्तात तडकाफडकी तो दुकान खोका रस्त्यावरून हटवून वाहनात घातला आणि महापालिकेच्या गोदामात रवाना केला. या दरम्यान कांदा मार्केट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि दुकानाचा खोका बसविणारे लोक यांच्यातील वादावादीमुळे परिसरात कांही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र दक्षता घेत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.

About Belgaum Varta

Check Also

युवा समितीच्या वतीने आयोजित सामान्यज्ञान स्पर्धा यशस्वी करण्याचा बैठकीत निर्धार

Spread the love  महामेळाव्याला आडकाठी आणणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *