बेळगाव : मार्शल राधाकृष्णन राधिष यांनी हवाई दलाच्या ट्रेनिंग कमांडच्या एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ
पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर बेळगावच्या एअरमन ट्रेनिंग स्कूलला भेट दिली.
एअर कमोडोर एस. श्रीधर यांनी त्यांचे स्वागत केले. नंतर त्यांना हवाई सैनिकांनी मानवंदना दिली. एअर मार्शल राधाकृष्णन राधिष यांनी एअरमन ट्रेनिंग स्कूलच्या विविध विभागांना भेट दिली. सध्या एअरमन ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या पहिल्या अग्नीवायूवीर प्रशिक्षणार्थिंशी संवाद साधला.
प्रशिक्षण घेणाऱ्या अग्नीवायूवीर प्रशिक्षणार्थिंनी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम राहिले पाहिजे. प्रशिक्षणाचा उपयोग सेवा बजावताना होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून घ्यावी, असे आवाहन एअर मार्शल राधाकृष्णन राधिष यांनी प्रशिक्षणार्थींना केले.