निपाणी (वार्ता) : निपाणी भागातील शेतकऱ्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत बाबूराव बळवंत पाटील-बुदिहाळकर यांच्या ३३ व्या स्मृतिदिनी माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री विरकुमार पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्यासह मान्यवरांनी कारखाना कार्यस्थळावरील स्मृतीस्थळी पुष्पहार
अर्पण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
यावेळी काकासाहेब पाटील यांनी बाबुराव पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून हाशुगरला दिलेले योगदान न विसरण्या सारखे नसण्याचे सांगितले.
माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्यासह मान्यवरांनी दिवंगत बाबुराव पाटील- बुदिहाळकर यांच्या अनेक आठवणींना
उजाळा देत शेतकऱ्यांच्या हितासाठी दिलले योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. सुकूमार पाटील-बुदिहाळकर कुटूंबियातर्फेही स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी हालशुगरचे संचालक सुकुमार पाटील- बुदिहाळकर, सूर्यकांत पाटील बुदिहाळकर, हालशुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, उपाध्यक्ष एम. पी. पाटील, संचालक विश्वनाथ कमते, दीपक ढणाल, सुनील तावदारे, साखर संघाचे अध्यक्ष विश्वनाथ कमते, संचालक पप्पू पाटील, जयप्रकाश खोत, अशोककुमार असोदे, दत्ता लाटकर, महादेव रेंदाळे, प्रकाश शिंदे, समित सासणे, आर. एम. खोत, रामगोंडा पाटील, शंकर घटवडे, सुंदर पाटील, विजय मेत्राणी, प्रताप मेत्राणी, बाबसो देसाई, जहांगीर शिरकोळी, अमर पाटील, राजू कोंडेकर यांच्यासह निपाणी परिसरातील शेतकरी व बुदिहाळकर कुटुंबीय उपस्थित होते.