निपाणी (वार्ता) : जत्राट वेस येथील फुले, शाहू, आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळातर्फे १०५ वा भीमा कोरेगाव शौर्यदिन साजरा साजरा करण्यात आला. त्यानिमित्त मंडळाच्या वतीने चौकाचौकात शौर्य विजयतंभास मान वंदनानाचे फलक लावले होते. मंडळाच्यावतीने भीमा कोरेगाव येथील शौर्य विजयस्तभाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. त्याठिकाणी विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी महार रेजिमेंटच्या निवृत्त सैनिकांना आमंत्रित करण्यात आले होते. प्रारंभी जत्राटवेस निपाणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेस मधुकर पकाले (१५ फिल्ड रेजिमेंट, कारगिल युद्ध) तायाप्पा शिवराम ८ महार रेजिमेंट) पुरंदर यादव (३ महार रेजिमेंट) व कॅप्टन मनोहर गायकवाड (८ महार रेजिमेंट) तायाप्पा शिवराम घस्ती (८ महार रेजिमेंट) व मान्यवरांचे
मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर क्रांती स्तंभास मानवंदना देण्यात आली. मंडळाच्या वतीने माजी महार बटालियन सैनिकांचा संविधानाची प्रस्ताविक उद्देशिका देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
मंडळाचे अध्यक्ष अमित कांबळे यांनी, जगात अनेक लढाया लढल्या गेल्या पण भीमा कोरेगावची लढाई सत्तेसाठी नसून स्वाभिमानासाठी लढले गेली. ती जागतिक, ऐतिहासिक लढाई असल्याचे सांगितले. मंडळाचे विकि कांबळे, सूरज कांबळे, चेतन शिंदे, शिवराज कांबळे, रोहित मड्डे, अक्षय घस्ते, मनोज सावंत, अभिजीत माने, देवेंद्र घस्ते, उमेश कांबळे, उत्तम वाळके, रतन पोळ, सूरज कांबळे, विनय घस्ते, पांडुरंग कांबळे, रमेश वाळके, नितीन कांबळे यांच्यासह मंडळा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सागर जाधव यांनी सूत्रसंचालन केले. विनोद शेट्येनवर यांनी आभार मानले.