बेळगाव : 2017 मध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यालयावर परिवहन मंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ध्वजारोहण केले होते. मात्र यावेळी तिरंग्यापेक्षा लालपिवळा ध्वज अधिक उंचीवर फडकत होता. राष्ट्रध्वजाचा गौरव नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी म. ए. समितीचे कार्यकर्ते मदन बामणे यांनी 27 जानेवारी रोजी मार्केट पोलीस स्थानकात रीतसर तक्राक नोंदविली व संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी केली होती.
तक्रार नोंद झाल्यानंतर जेएमएफसी द्वितीय सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे.
राष्ट्रध्वज अवमान सुनावणी जलदगती न्यायालयात होणे अपेक्षित होते मात्र प्रशासकीय यंत्रणेने ही बाब फारशी गांभिर्याने घेतली नाही. सदर सुनावणीवर जबाब नोंदविण्यासाठी सहा वर्षाचा कालावधी लागणे ही खेदजनक बाब म्हणावी लागेल. जबाब नोंदवत असताना सरकारी पक्षाच्या वकिलांनी उलटसुलट प्रश्नांचा भडिमार चालविला होता. मात्र समिती नेते मदन बामणे यांनी न्यायालयात सडेतोड उत्तर दिले व संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही झाली पाहिजे अशी मागणी केली.
Belgaum Varta Belgaum Varta