Thursday , March 5 2026
Breaking News

बेळगाव महापौर, उपमहापौर निवडणूक 6 फेब्रुवारीला

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव महानगर पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक 6 फेब्रुवारी 2023 ही निश्चित झाल्याचे प्रादेशिक आयुक्त डॉ. महांतेश हिरेमठ यांनी कळवले आहे.
बेळगाव महानगर पालिकेची निवडणूक झाल्यास जवळपास सव्वा वर्ष उलटले आहे. मात्र महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा मुहूर्त काही लागत नव्हता. यासंदर्भात आमदारांनी देखील दोन वेळा निवडणूक होणार असल्याचे सांगितले होते. नुकतेच 31 जानेवारीला ही निवडणूक होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आता ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून ती आता 6 फेब्रुवारीला निश्चित करण्यात आल्याचे प्रादेशिक आयुक्त डॉ. महांतेश हिरेमठ यांनी कळवले आहे. महापौर पदासाठी सामान्य महिला तसेच उपमहापौर पदासाठी ओबीसी महिला असे आरक्षण यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक आयुक्तांनी सांगितले आहे.

About Belgaum Varta

Check Also

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे बेळगाव विमानतळावर स्वागत

Spread the love  बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील तीर्थ क्षेत्र यडूर येथील श्री वीरभद्रेश्वर मंदिरात आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *