Monday , December 23 2024
Breaking News

धर्मवीर संभाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा होणार भव्यदिव्य!

Spread the love

 

 

बेळगाव : छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळ्याच्या नियोजनाची बैठक समाजाच्या विविध घटकांच्या उपस्थितीत पार पडली. बेळगावचा मानबिंदू असणाऱ्या धर्मवीर संभाजी चौकातील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे. बेळगावच्या वैभवात भर घालणारे हे स्मारक शहराचे केंद्रबिंदू ठरले आहे, ह्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. सदर लोकार्पण कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी बेळगावातील अनेक संघटनाचे प्रमुख, अभ्यासक, महनिय व्यक्ती यांची आज धर्मवीर संभाजी चौकात सकाळी आठ वाजता बैठक पार पडली. स्मारकाच्या कामकाजाची पाहणी करून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर लोकार्पण सोहळा कशाप्रकारे असावा याची रूपरेषा ठरविण्यात आली. स्मारकाच्या ठिकाणी संभाजी महाराजांच्या संबंधित अध्ययावत सुसज्ज ग्रंथालयाची निर्मिती करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्राच्या अभ्यासाला सदर ग्रंथालय उपयोगी पडणार आहे,

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार अनिल बेनके यांनी शोभायात्रेत कोणत्याही कमतरतेशिवाय बेळगावच्या लौकिकाला साजेसा सोहळा केला जाईल, असे यांनी सांगितले.

सदर कार्यक्रमास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सुशोभीकरण स्मारक समितीचे अध्यक्ष सुनील जाधव, सरचिटणीस प्रसाद मोरे, मराठा समाजाचे नेते प्रकाश मरगाळे, श्रीरामसेना हिंदुस्थानाचे अध्यक्ष रमाकांत कोंडूस्कर, दत्ता जाधव, रमेश रायजादे, गुणवंत पाटील, शहर देवस्थान अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, शिवप्रतिष्ठान अध्यक्ष किरण गावडे, शहर अध्यक्ष विश्वनाथ पाटील, परशराम कोकितकर, विश्व हिंदू परिषदचे विजय जाधव, हेमंत हावळ, रामसेना जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर, नगरसेवक संतोष पेडणेकर, शंकर पाटील, जयतीर्थ सौन्दती, प्रवीण पाटील, संजय जाधव, विकास कलगटगी, सागर पाटील, विनायक पवार, राहुल जाधव, योगेश कलघटगी, नितीन जाधव, श्रीनाथ पवार, अभियंता मुरलीधर बाळेकुंन्द्री, आदित्य पाटील, निशा कुडे, ओमकार पुजारी, गिरीश पाटील, प्रथमेश किल्लेकर, मनोज काकातकर, वैभव धामणेकर आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक गुणवंत पाटील व आभार सुनील जाधव यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर

Spread the love  येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *