
अनेक वर्षापासून महाराष्ट्र – कर्नाटक या राज्यांतील सीमेवरील दोन गावे देवरवाडी आणि कोणेवाडी या गावांमधील दुवा ठरणारा रस्ता अनेक वर्षापासून वर्दळीचा होता पण आजपर्यंत याकडे दुर्लक्ष होते, महाराष्ट्र सीमा भागातून अनेक शेतकरी वर्ग तसेच शिनोळी औद्योगिक वसाहतीत कामाला जाणारे कामगार वर्ग यांना पावसाच्या दिवसात या रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागत होती. पण आज चंदगडचे कार्यसम्राट आमदार मा. श्री. राजेश पाटील साहेब यांच्या फंडातून या रस्त्याचे काम मार्गी लागले.
कामाचे उद्घाटन राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे अध्यक्ष तसेच ग्राम पंचायत देवरवाडीचे सदस्य श्री. राजाराम जाधव यांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य बसवंत कांबळे गुरुजी, क्रांती दीपक सुतार, जयश्री करडे, माजी उपसरपंच मनोहर सिद्धार्थ सर, देवरवाडी दूध डेअरीचे नवनिर्वाचित संचालक शशिकांत जाधव, गोपाळ आडाव, वैजनाथ देवस्थान कमिटी अध्यक्ष नारायण भोगण, खजिनदार बाळाराम करडे, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार अडाव, बाळाराम भोगण, केदारी आंदोचे, संदीप जाधव, महादेव आडाव, बसवराज पुजारी तसेच कोणेवाडी ग्रामपंचायतचे सदस्य मोणाप्पा पाटील, निंगो कंग्राळकर व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी दोन्ही गावातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta