बेळगाव : शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खडेबाजार बेळगाव येथे आज दि. 23 जानेवारी रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना जिल्हाप्रमुख, आर्यन फौंडेशनचे संस्थापक चेअरमन हणमंत मजुकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना हणमंत मजुकर म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सीमाप्रश्नी दिलेले योगदान खूप मोलाचे आहे. सीमाप्रश्न लवकरात लवकर सुटावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. ते नेहमीच सीमावासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. ते सीमावासीयांची आधारस्तंभ होते.
खडेबाजार येथील कार्यालयात शिवसैनिकांनी लाडू वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी अमोल मजूकर, परशराम गोंदकर, मीनाक्षी पाटील, भारती राक्षे, अमोल पाटील, शंकर गुरव, विनायक कुंडेकर, विनोद सुतार यांच्यासह शिवसैनिक व सीमावासीय उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta