
बेळगाव : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा ९७व्या जयंतीनिमित्त युवासेना बेळगावतर्फे आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरित्या संपन्न झाला.
या कार्यक्रमाला बेळगावकारांनी भरघोस प्रतिसाद दिला. सुमारे ६३ दानवीरांनी रक्तदान केले. यावेळी दानवीरांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सुरुवात बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली व शिवसेना व म. ए. समिती ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, युवासेनेचे बेळगाव प्रमुख विनायक हुलजी,-वैभव कामत, महेश मजुकर, मल्हार पावशे, मयांक पावशे, गौरांग गेंजी, श्वेत तवनशेट्टी, ओमकार बैलूरकर, विद्येश बडसकर, प्रणव बेळगावकर, आदित्य तिरविर, उमेश पाटील, अमेश देसाई, अनिकेत लाड, इत्यादी युवसैनिक यावेळी उपस्थित होते. युवासेना बेळगाव प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वी झाला.
Belgaum Varta Belgaum Varta