बेळगाव : नॅशनल व्हेंडर्स डे निमित्त बेळगावातील पदपाथ व्यापाऱ्यांनी शहरातून मिरवणूक काढली. दरवर्षी नॅशनल व्हेंडर्स डे २४ जानेवारी रोजी साजरा केला जातो.
रस्त्यावर बसून विक्री करणाऱ्या भाजीपाला, फळ विक्रेते, हातगाडीवर विविध वस्तूंची विक्री करणारे विक्रेते मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीत अग्रभागी असलेल्या चित्रविचित्र मुखवट्याच्या पात्रांनी रस्त्यावरून जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. पंधरा फूट उंचीच्या नरसिहांच्या वेशातील पात्र मिरवणुकीचे आकर्षण ठरले होते. तालबद्ध वादन करणाऱ्या महिला झांज पथकाने देखील साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील विविध मार्गावर फिरून कुमार गंधर्व मंदिर येथे मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणुकीत रस्त्यावर बसून विक्री करणारे शेकडो व्यापारी सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta