१४ नोव्हेंबर रोजी स्नेह ऋणानुबंध मेळावा
बेळगाव (रवी पाटील) : बेळगाव येथील मराठा मंडळ हायस्कूलच्या सन १९८३ माजी विद्यार्थ्यांची आयोजन बैठक मिलेनियम गार्डनच्या बाजूला डी. एस. जाधव यांच्या कार्यालयात डी. एस. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
यावेळी या बैठकीत रविवार दि. १४ नोव्हेंबरला सायंकाळी ५.३० वा. ईफा हॉटेल क्लब रोड बेळगाव येथे स्नेह मेळावा घेण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
या माजी विद्यार्थ्यांना ज्या गुरु माऊली ज्ञानार्जन केले ते गुरु माऊलींचा सत्कार करणे, माजी विद्यार्थ्यांनी सापत्नीक किंवा सहपरिवार उपस्थित राहणे व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता होईल.
या माजी विद्यार्थी या नात्याने सामाजिक भान ठेवून समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो यामुळे लोकोपयोगी विधायक कामे करण्याचा संकल्प सोडला.
भरगच्च कार्यक्रम करून जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांची मनोगत व्यक्त केली जाणार आहेत. तसेच गुरुमाऊलींशी ऋणानुबंध होवून कृतज्ञता हा मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन प्रशांत रामपूरे यांनी केले.
यावेळी बैठकीला शांताराम बळवंत गुरव, सुकुमार मडिवाळ, मोहन कुरियाळकर, गजाजन ठोकणेकर, अनंत पाटील, मोहन जुवेकर, महेश मोरे, मारुती विठ्ठल पाटील, लक्ष्मण जी. पाटील, सुनिल तरळे, संजय महेंद्रकर व वसंत किल्लेकर यासह आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.